Wednesday, June 19, 2024
Homeनाशिकनरहरी झिरवाळांनी अखेर 'त्या' फोटोबाबत दिले स्पष्टीकरण; म्हणाले,"मी शरद पवार गटासोबत…"

नरहरी झिरवाळांनी अखेर ‘त्या’ फोटोबाबत दिले स्पष्टीकरण; म्हणाले,”मी शरद पवार गटासोबत…”

नाशिक | Nashik

- Advertisement -

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) धामधूम सुरु असून येत्या सोमवारी (दि. १३ मे) रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान (Voting) पार पडणार आहे. त्यानंतर पुढील सोमवारी म्हणजेच (दि.२० मे) रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा (Dindori and Nashik Loksabha) मतदारसंघांचा देखील समावेश आहे.

राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी असे राजकीय समीकरण असल्याने दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांना युती धर्म पाळत लोकसभेच्या उमेदवाराचा (Candidate) प्रचार करावा लागत आहे. मात्र, अशातही काही नेते युतीचा धर्म पाळत नसल्याचे दिसत असून आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होतांना दिसत नाही. त्यामुळे मित्रपक्षांमध्येच नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांचा प्रचार न करता विरोधीपक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली होती.

अशातच काल दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) तिसगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे ( Bhaskar Bhagre) यांच्या प्रचारसभेच्या व्यासपीठावर उपस्थित असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे झिरवाळ घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर आता झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळी बोलतांना झिरवाळ म्हणाले की, भगरे यांच्या प्रचारार्थ तिसगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी गावातील मंदिराच्या कामाचा शुभारंभ होणार होता. तिथे मला पूजेसाठी आमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळी मी फक्त तेथील लोकांच्या आग्रह खातर त्याठिकाणच्या खुर्चीवर बसलो होतो. यावेळी माझ्या शेजारी आदिवासी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बागुल सर बसले होते. मात्र, काही वेळानंतर बागुल सर उठले आणि तिथे दिंडोरीचे मविआचे उमेदवार भास्कर भगरे आणि इतर काही नेते येऊन बसले. त्याचवेळी कोणीतरी हा फोटो काढला आणि त्या मिनिटांत तो तिथून निघून गेला. त्यामुळे सोशल मीडियावर तो फोटो टाकून माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले, असे असून मी अजित पवारांसोबतच आहे, त्यामुळे शरद पवार गटासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही”, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, दिंडोरी लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याआधी आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी
शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) लोकसभेच्या तिकीटासाठी फिल्डिंग लावली होती. त्यावेळी गोकुळ झिरवाळ यांनी खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांची भेटही घेतली होती. परंतु, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर काल नरहरी झिरवाळ यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबतचा एका व्यासपीठावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने झिरवाळ हे पुन्हा शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली होती. यानंतर अखेर आज यावर झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिल्याने चर्चेला तूर्तास तरी पूर्णविराम मिळाल्याचे दिसते.

- Advertisment -

ताज्या बातम्या