मुंबई | Mumbai
नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या सेवेत असणाऱ्या आणि भारतीय वंशाच्या असल्यामुळे देशासाठी अभिनास्पद कामगिरी करणाऱ्या सुनिता विलियम्स यांचे अवकाशातून परतीच्या प्रवासाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. तब्बल ९ महिने आणि १३ दिवसांच्या कालावधीनंतर आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुनिता विलियम्स, बुच विल्मोर आणि क्रृ मेंबर पृथ्वीवर परतण्यासाठी अवकाशातून मार्गस्थ झाले.
१७ तासांच्या प्रवासानंतर, दोन्ही अंतराळवीर SpaceX क्रू ड्रॅगन कॅप्सूलने पृथ्वीवर परतणार आहे, फ्लोरिडामध्ये बुधवारी पहाटे स्प्लॅशडाउन शेड्यूल केले जाईल. चारही अंतराळवीर ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये बसल्यानंतर सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी या स्पेसक्राफ्टचे हॅच म्हणजेच दरवाजे बंद झाले आणि १० वाजून ३५ मिनिटांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून हे स्पेसक्राफ्ट वेगळे झाले. १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी हे स्पेसक्राफ्ट फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँड होत पृथ्वीवर उतरणार आहे.
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासह निक हेग आणि अलेक्झांडर गोरबुनोव हे आणखी दोन अंतराळवीरही त्यांच्यासोबत १८ मार्च २०२५ रोजी या एकमेव मानवी जीवनाचे अस्तित्व असणाऱ्या ग्रहाच्या दिशेने झेपावले.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर घरी परतताना सामान्य गुरुत्वाकर्षण परिस्थितीत पुन्हा एकत्रित होण्यापूर्वी मानक वैद्यकीय मूल्यांकनांचा समावेश असेल. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या पृथ्वीवर परतण्याची अंतिम तयारी नासाच्या परतीच्या प्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणात विल्यम्स आणि विल्मोर हे अंतराळ स्थानकावरून हॅच बंद करून खाली उतरण्याची तयारी करताना दिसले, यासंदर्भातील एक फोटोही टिपण्यात आला आहे.
फ्लोरीडाच्या खाडी/ सागरी किनाऱ्यावर अचूक स्प्लॅशडाउन स्थान सध्याच्या हवामान परिस्थितीवर अवलंबून असेल. लँडिंगनंतर, पुनर्प्राप्ती पथके अंतराळवीरांना टेक्सासमधील ह्युस्टन येथील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये घेऊन जातील, जिथे त्यांचे नियमित वैद्यकीय मूल्यांकन केले जाईल.
नासाने या संपूर्ण मोहिमेचे असंख्य व्हिडीओ X च्या माध्यमातून शेअर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आणि आयएसएस एकमेकांपासून वेगळे होताना अर्थात संपूर्ण अनडॉकिंग प्रक्रिया पार पडताना दिसत आहे. चारही अंतराळवीरांसह सुनिता विलियम्स यांनी अंतराळाला अलविदा करत अखेर पृथ्वीच्या दिशेने कूच केली.
स्पेसक्राफ्ट लँड होणे अतीव महत्त्वाचे असून त्यातील अखेरचे प्रत्येक मिनिट तितकेच महत्त्वाचे असणार आहे.
१८ मार्च सकाळी ८ वाजून १५ मिनिटे – यानाची दारे बंद अर्थात हॅच क्लोज
१८ मार्च सकाळी १० वाजून ३५ मिनिटे- अनडॉकिंग (आयएसएसपासून यान वेगळे होणे)
१९ मार्च सकाळी २ वाजून ४१ मिनिटे – डीऑर्बिट बर्न (वातावरणात यानाचा प्रवेश)
१९ मार्च सकाळी ३ वाजून २७ मिनिटे – स्प्लॅशडाऊन (समुद्रात यानाची लँडिंग)
१९ मार्च सकाळी ५ वाजता- पृथ्वीवरील परतीच्या प्रवासासंदर्भात माध्यमांशी संवाद
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा