Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNasarapur Case: मोठी बातमी! नसरापूर प्रकरणातील नराधमावर आरोप निश्चित; फक्त २८ दिवसांत...

Nasarapur Case: मोठी बातमी! नसरापूर प्रकरणातील नराधमावर आरोप निश्चित; फक्त २८ दिवसांत न्यायालयाचा मोठा निर्णय

पुणे | Pune
नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणातील खटल्याची विशेष न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली. या प्रकरणी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयाकडून आरोपीविरोधात प्राईमा फेसी पुरावे असल्याचे निरीक्षण न्यायालाकडून नोदवण्यात आले आहेत. आरोपी भीमराव कांबळे याच्यावर आरोपी निश्चित झाले असून फक्त २८ दिवसात पोलिसांनी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्याय मिळवून देण्याता प्रयत्न केला आहे.

पुरावे नसल्याने आरोपीवर आरोप निश्चित
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला पहिल्यांदाच प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडून युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला, मात्र पुरावे नसल्याने आरोपीवर आरोप निश्चिती करण्यात आली. पंधरा दिवसात चार्जशीट दाखल करण्यात आले होते. ते सादरही करण्यात आले होते.

- Advertisement -

Raj Thackeray: स्वतःच्या राजकारणासाठी वापर करणाऱ्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत? राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावले खडेबोल

इन कॅमेरा होणार सुनावणी
याप्रकरणातील लैंगिक चाचणी, सीसीटीव्ही फुटेज या सगळ्याची तपासणी पुन्हा एकदा करण्यात आली, त्याचबरोबर चार्जशीट पत्राची माहिती देखील यावेळी न्यायालयाला देण्यात आली या आरोपीवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. आता रोज या प्रकरणाची सुनावणी ‘इन कॅमेरा’ पद्धतीने होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आरोपी भीमराव कांबळे याच्यावर नवीन कायद्यानुसार म्हणजेच ‘भारतीय न्याय संहिता , २०२३’ च्या कलम १०३(१), ६४, ६५(२), ७४, १३७(२), १४०(१) आणि ‘पोक्सो’ (पाँक्सो Act, २०१२) कायद्याच्या कलम ४, ६, ८ व १२ अन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लाचलुचपत विभागाचे बनावट अधिकारी गजाआड! आलिशान गाडीसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सरकारी कार्यालयात रुबाब दाखवून आणि आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau) बडे अधिकारी असल्याचे भासवून दिशाभूल करणाऱ्या एका हायप्रोफाइल टोळीचा...