नाशिक | Nashik
नाशिक-सिन्नर महामार्गावरील ( Nashik-Sinnar Highway) साकूर फाट्याजवळ (Sakur Phata) शिर्डीला (Shirdi) साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या मिनी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ११ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील (Mumbai) घाटकोपर येथून शिर्डीच्या दर्शनासाठी निघालेली मिनी ट्रॅव्हल बस आणि समोरून येणाऱ्या डंपर यांच्यात साकूर फाट्याजवळ समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेनंतर बसचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झाला.
या अपघाताचा (Accident) मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य सुरु केले. तसेच घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तर जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून एसएमबीटी रुग्णालयात (SMBT Hospital) पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, काही जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना इतर रुग्णालयात (Hospiital) हलविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अपघातात मिनी बसचा समोरील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून डंपरचेही मोठे नुकसान (Damage) झाल्याचे बोलले जात आहे.