Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Accident : अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Nashik Accident : अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नाशिक | Nashik

धुळ्याकडून मुंबईकडे (Mumbai) लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला भरधाव टेम्पोने (छोटा हत्ती) पाठीमागून जोरदार धडक दिल्याने नाशिकमधील (Nashik) द्वारका चौकातील (Dwarka Chowk) उड्डाणपुलावर रविवारी (दि.१२) रोजी रात्री साडे सातच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली होती. या अपघातात लोखंडी सळई शरीरात शिरुन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर अपघातातील जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

त्यानंतर आता अपघातातील जखमींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पाच लाखांची मदत (Help) जाहीर केली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले की, नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू (Death) झालेल्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

अपघातातील मृतांची नावे

१) अतुल संतोष मंडलिक (वय २२) २) संतोष मंडलिक (वय ५६) ३) यश खरात ४) दर्शन घरटे ५) चेतन पवार (१७)

जखमींची नावे

१) सार्थक (लकी) सोनवणे, २) प्रेम मोरे, ३) राहुल साबळे, ४) विद्यानंद कांबळे, ५) समीर गवई, ६) अरमान खान, ७) अनुज घरटे, ८) साई काळे, ९) मकरंद आहेर, १०) कृष्णा भगत, ११) शुभम डंगरे, १२) अभिषेक, १३) लोकेश (दोघांची पूर्ण नावे समजू शकलेले नाही)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...