Wednesday, September 30, 2026
HomeनाशिकNashik Accident : आयशरच्या धडकेत वृद्धा ठार

Nashik Accident : आयशरच्या धडकेत वृद्धा ठार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेचा (Old Woman) भरधाव आयशरच्या (Eicher) धडकेत जागीच मृत्यु (Death) झाला. हा ह्रदयद्रावक अपघात शनिवारी(दि. २) दुपारी दोन वाजता मुंबई- आग्रा महामार्गावरील बळी मंदिराजवळ घडला. राधाबाई रामभाऊ गायकवाड (वय ७०, रा. हनुमाननगर, अमृतधाम) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

- Advertisement -

राधाबाई या घरातून (Home) निघून बळी मंदिराजवळ पोहोचल्या. त्या पायी महामार्ग ओलांंडत असतांना पेशवा हॉटेलसमोर( एमएच ०४ एलक्यू ९७१३) वरील आयशर चालकाने धुळ्याकडून मुंबईकडे जातांना राधाबाई यांना जोरदार धडक दिली. त्यांच्या डोक्यास आणि पायास जबर दुखापत झाल्याने आणि रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. घटनेनंतर पोलीस दाखल झाले. याबाबत पंचवटी पोलीसांत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून परिसरावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, हा जुना आडगाव नाका (Old Aadgaon Naka) ते ओझर आणि रासबिहारी -नांदूरनाका लिंक रोडवर अपघातांचे सत्र सुरुच आहे. सर्वच अवजड वाहने याच मार्गाने मार्गक्रमण करत असल्याने पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वीच रासबिहारी लिंक रोडवर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू तर पती जखमी झाल्याची घटना घडली होती.

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये; राज्य शिक्षण...

0
मुंबई | Mumbai राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक...