Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Accident : खाजगी लक्झरी बस 200 फुट दरीत कोसळून भीषण अपघात;...

Nashik Accident : खाजगी लक्झरी बस 200 फुट दरीत कोसळून भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, अनेक जखमी

बोरगाव | प्रतिनिधी | Borgaon

नाशिक-गुजरात महामार्गावरील (Nashik-Gujarat Highway) सापुतारा घाटात (Saputara Ghat) खाजगी लक्झरी बस 200 फुट दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, आज (रविवार) पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात ५ जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून ४५ जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की बस (Bus) दरीत कोसळल्याने बसचे दोन तुकडे झाले आहेत. तसेच बसमधील जखमी २१ प्रवासी यांना शामगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमी २४ यांना अहावा येथे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या बसमधील प्रवासी नाशिकहून (Nashik) देवदर्शन आटोपून गुजरातकडे देवदर्शनासाठी चालले होते. त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी प्रवासी मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) राहणारे आहेत. .

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे

रतनलाल देविराम जातव (४१), बोलाराम पोसाराम कुसवा (५५), गुहीबेन राजेशभाई यादव (६०), बिजेंद्र बादल यादव (५५), कमलेश भाई यादव (६०, सर्व राहणार मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...