Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

ओझे | विलास ढाकणे | Oze

दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed) झाले. तर मुलगी गंभीर जखमी झाले आहे. जखमी मुलीला (Girl) तातडीने खाजगी रुग्णालयात करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) वलखेड फाटा येथील वजन काट्यासमोर कार क्रमांक (एमएच ०१ डीवाय ०६९१) व राधे ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो क्रमांंक (एमएच ०५ एफ.जे ८१८८) यांच्यात भीषण अपघात झाला. करंजवण येथील सतीश राजाराम बर्डे (४३) , पत्नी सुरेखा सतीश बर्डे (४०) व मुलगी समृध्दी सतीश बर्डे (१७) हे तिघे कारव्दारे निळवंडी येथून नातेवाईकाकडून आपल्या करंजवण (Karanjavan) गावी परतत असतांना सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचा वलखेड फाट्याजवळील दिंडोरी वजन काट्याजवळ समोरुन येणारी आयशरशी धडक होत त्यात तिघेही गंभीर जखमी झाले.

YouTube video player

दरम्यान, त्यांना नाशिक (Nashik) येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता पती-पत्नी मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर मुलगी समृध्दी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात (Dindori Police Station) अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख आदी करीत आहे. यावेळी करंजवण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

करंजवण गावावर शोककळा

करंजवण येथे सतीश बर्डे दांपत्य अपघातात मृत्यू (Deatj) झाल्याने करंजवण ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळला. करंजवण येथील ग्रामस्थांनी सकाळपासूनच संपूर्ण दुकाने बंद ठेवली. आपले दैनदिन व्यवहार बंद केले. त्याचप्रमाणे माहेर असलेल्या सुरेखा बर्डे यांच्या निळवंडी येथेही शोककळा पसरली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रिव्हॉल्वर हलगर्जीपणे हाताळल्याचा ठपका; दोन पोलीस अंमलदार निलंबित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना सुरक्षा देणारे दोन पोलीस बॉडीगार्ड कर्तव्यात कसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत....