नाशिक | Nashik
शहरातील ठक्कर बाजार बसस्थानकात रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे दर्शनासाठी (Darshan) निघालेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा एसटी बसच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू (Death) झाला. आकांक्षा रामभाऊ शेलार असे या मृत तरुणीचे (Young Woman) नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा ही आपल्या कुटुंबासमवेत त्र्यंबकेश्वर येथे देवाच्या दर्शनासाठी (Darshan) जाण्याकरिता ठक्कर बाजार बसस्थानकात (Thakkar Bazar Bus Stand) आली होती. रविवारी रात्रीच्या वेळी स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी (Crowd) होती. गाडी पकडण्याच्या घाईत प्रवाशांमध्ये लोटालोटी सुरू असताना, आकांक्षाला अचानक जोराचा धक्का लागला आणि ती थेट जमिनीवर कोसळली. नेमक्या याच वेळी स्थानकातून पुढे जाणाऱ्या एसटी बसचे मागील चाक तिच्या अंगावरून गेले.
दरम्यान, हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, आकांक्षाचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे ठक्कर बाजार बसस्थानक (Bus Stand) परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तसेच प्रवाशांच्या (Passengers) सुरक्षेचा आणि गर्दीच्या नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आईने डोळ्यांसमोर पाहिला लेकीचा काळ
आपल्या पोटच्या गोळ्याचा डोळ्यांसमोर असा भीषण अपघात झाल्याचे पाहून आकांक्षाच्या आईला प्रचंड धक्का बसला आणि त्या जागीच भोवळ येऊन पडल्या. घटनेनंतर आकांक्षाच्या चुलत भावाने प्रसंगावधान राखत तिला तातडीने रिक्षातून नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) उपचारासाठी नेले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.




