दहिवड | प्रतिनिधी | Dahiwad
मुबंई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चिंचवे येथील आदिवाशी वस्तीजवळ रस्ता ओलांडत असताना नाशिककडून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने एका ३२ वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला…
- Advertisement -
आज पहाटे रस्ता क्रॉस करुन घराकडे येत असताना रस्ता दुभाजक ओलांडताना रस्त्यावर पाउल टाकताच नाशिककडून मालेगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने तरुणाला जोरदार धडक दिली. त्यात दिपक बारकू पवार याच्या डोक्याला जबर मार लागला.
त्यानंतर तरुणास मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यास तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.