Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Accident News : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

Nashik Accident News : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

पेठ | Peth | वार्ताहर | Peth

येथील पेठ-वापी मार्गावरील (Peth-Wapi Highway) कुंभाळे फाट्यानजीक पेठकडून गुजरातकडे (Peth to Gujarat) जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागुन भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वराच्या छातीवरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला .

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमनाथ चंदर राथड (वय ४६) रा.आंबे असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तो कामानिमित्त गुजरातकडे (Gujarat) आपली दुचाकी क्रमांक एमएच १५ डीपी ९५८६ जात असतांना त्याच दिशेकडे जाणारा अशोक लेलँड कंपनीच्या (आरजे २७ जेई ७४५०) ट्रकने दुचाकीला (Bike) पाठीमगून धडक दिली.

YouTube video player

दरम्यान, या धडकेत सोमनाथ राथड पुढील टायर खाली दबले गेले, तर हात तुटून बाजूला जाऊन पडला होता. याप्रकरणी हेमराज राथड यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक (Truck Driver) त्रिलोक देवेंद्रसिंह रा. बसंतपुरा, ता. टॉटगंज जि.बेवार राजस्थान याच्याविरुद्ध अपघाताचा (Accident) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास एन.टी.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर.पी. टोपले करीत आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...