Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik Accident News : करंजाळीजवळ बस-कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक...

Nashik Accident News : करंजाळीजवळ बस-कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

पेठ | Peth

नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या महामार्गावर आज करंजाळीजवळ बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वर करंजाळी जवळील वळणावर पेठ आगाराची पेठ-पुणे बस क्र. एमएच ४० वाय ५९७४ व नाशिकहून गुजरातकडे जाणारी सनी कार क्र. जीजे o६ एफसी ३३३१ यांची दुपारी ४:०० वाजे दरम्यान समोरासमोर धडक झाली.

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल; अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात मोठा निर्णय

या अपघातात कारमधील सुरत येथील प्रवाशांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी तातडीने नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

जागतिक बँकेकडून पंतप्रधानांचे कौतुक; म्हणाले ५० वर्षांचं काम…

- Advertisment -

ताज्या बातम्या