Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमNashik Accident News : कर्तव्यनिष्ठेचा करुण अंत; तस्करांना रोखताना कारच्या धडकेत वनरक्षक...

Nashik Accident News : कर्तव्यनिष्ठेचा करुण अंत; तस्करांना रोखताना कारच्या धडकेत वनरक्षक ठार

नाशिक | Nashik

इगतपुरी वनपरिक्षेत्रात (Igatpuri Forest Area) अवैध लाकूड तस्कराच्या भांडाफोड केल्यानंतर जप्त मुद्देमाल व ट्रक म्हसरुळ वन डेपोत जमा करण्यासाठी जीवाची पर्वा न करता मध्यरात्री धावून जाणारे वनरक्षक गोरख देवराम बागूल (४८, रा. लक्ष्मी रोहाउस, मुरलीधरनगर, पाथर्डी फाटा) यांचा भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत मृत्यू झाला. शनिवारी (दि. १६) रात्री अकरा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) हॉटेल एक्स्प्रेस इनसमोरील उड्डाणपुलावर हा अपघात घडला. गोरख बागूल हे माजी सैनिक होते त्यांच्या निधनाने वनविभागात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

सूत्रांच्या माहितीनुसार, इगतपुरी वनविभागाच्या (Igatpuri Forest Department) पथकाने विल्होळीजवळ शनिवारी रात्री धाडसी कारवाई करत अवैध लाकडाची वाहतूक करणारा एक ट्रक जप्त केला होता. हा जप्त ट्रक कायदेशीर कारवाईसाठी नाशिकच्या म्हसरुळ डेपोत जमा करायचा होता. वनपाल सुनील पवार हे हा ट्रक घेऊन नाशिकच्या दिशेने येत होते. रात्रीची वेळ असल्याने आणि सुरक्षेचा उपाय म्हणून वनपाल पवार यांनी पाथर्डी फाटा येथे राहणारे वनरक्षक गोरख बागूल व अन्य दसऱ्या वनपालास मदतीसाठी बोलावून घेतले. पण, मी पाथर्डी फाटा येथेच राहतो, लवकरात लवकर मदतीसाठी पोहोचतो, असा शब्द देत बागूल यांनी कर्तव्यापोटी तत्परता दाखवली.

ते तातडीने घराबाहेर पडले. त्यांनी उड्डाणपुलाखाली आपले वाहन पार्क केले आणि पायी चालत उड्डाणपुलावरून रस्ता ओलांडत असतानाच, नाशिकहून मुंबईच्या (Nashik to Mumbai) दिशेने अतिवेगाने जाणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ कारने (एमएच १५ केके ४२८६) त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. सहकारी वनकर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. हा केवळ एक अपघात आहे की वनविभागाच्या कारवाईचा बदला घेण्यासाठी किंवा वनकर्मचाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी रचलेले हे लाकूड माफियांचे षडयंत्र आहे? याचा शोध आता वनविभागाचे घेत आहे.

कारचालक पसार

अपघातानंतर कारचालक संशयित जमीरूल्ला खान (रा. अंबड लिंकरोड, सातपूर) हा स्कॉर्पिओ सोडून पसार झाला आहे. वनखात्याने कारमधून वाहन चालकाचा परवाना आणि आरसी बुक जप्त केले आहे. हे सर्व महत्त्वपूर्ण दस्तऐवज पुढील कायदेशीर तपासासाठी आणि कारवाईसाठी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. बागूल यांच्या अपघाताचे वृत्त समजताच वनविभागात एकच खळबळ उडाली.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...