Monday, January 19, 2026
HomeनाशिकNashik Accident News : खाजगी ट्रॅव्हल्स आणि पिकअपचा भीषण अपघात; चौघे ठार,...

Nashik Accident News : खाजगी ट्रॅव्हल्स आणि पिकअपचा भीषण अपघात; चौघे ठार, २० हून अधिक जखमी

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील मालेगाव–मनमाड महामार्गावरील (Malegaon-Manmad Highway) वऱ्हाणे गावाजवळ आज (सोमवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स आणि पिकअपचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. तर २० पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून मालेगावच्या (Pune to Malegaon) दिशेने येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. या धडकेत पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसल्याने बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातातील मयत आणि जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत. या भीषण अपघातामुळे मालेगाव-मनमाड मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

हे देखील वाचा : Malegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये कोणता पक्ष ‘धुरंधर’; विजयी उमेदवारांची यादी वाचा सविस्तर

दरम्यान, अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलिस व स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले. यानंतर जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर पोलिसांनी (Police) घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ जानेवारी २०२६ – हेच लोकांचे मागणे

0
राज्यातील विविध महानगर-पालिकांमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आवश्यक स्पष्ट बहुमत बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने जिंकले आहे. मतदारांनी त्यांचा कौल स्पष्टपणे नोंदवला आहे. तरीही...