Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच ठार

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच ठार

दिंडोरी | Dindori

तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, यातील तीन जण गुजरातचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर एक जण कुठला रहिवासी आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ईरटीका गाडी ही गुजरातकडून नाशिककडे (Nashik) येत होती. तर स्कॉर्पिओ नाशिकवरून पेठकडे जात होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य करत आहेत.

YouTube video player

दरम्यान, या अपघातात किसनलाल गुर्जर (वय ४५), पुनम गुर्जर (वय ४०), छोगालाल गुर्जर ( वय ६४) आणि शाहरुख खान खराकत खान यांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर खुशी गुर्जर आणि गणेशी गुर्जर हे जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...