Wednesday, October 7, 2026
HomeनाशिकNashik Accident News : रामवाडीत भरधाव कारचा थरार; रस्त्याच्या कडेला संवाद करणाऱ्या...

Nashik Accident News : रामवाडीत भरधाव कारचा थरार; रस्त्याच्या कडेला संवाद करणाऱ्या पती-पत्नीसह चाैघे जखमी, चालक पसार

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटीतील (Panchvati) रामवाडी (Ramwadi) येथील श्रद्धा पार्कजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास बेदरकार कारचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत पती-पत्नीसह दाेन भावंडांना धडक देऊन जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या अपघातानंतर संशयित कारचालक चेतन संताेष विसपुते (रा. चांदाेरी) गाडी सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

​पाेलिसांच्या (Police) माहितीनुसार, रविवारी (दि. ४) रात्री अकरा वाजेच्या सुमारास रामवाडी भागातील श्रद्धा पार्कजवळ सागर रमेश कापडे (वय ३८) आणि त्याची पत्नी कुसुम(वय ३६, दाेघे रा. आदर्शनगर, रामवाडी) व साैरभ व शुभम् क्षिरसागर हे भावंड जेवण झाल्यानंतर श्रद्धा पार्कजवळ रस्त्याच्या कडेला उभे राहून बाेलत असताना रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १५ जीए ७८२१) या इनोव्हा क्रेटा कारचा चालक विसपुते याने अचानक वाहनावरील ताबा गमावला आणि रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या या चाैघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग, बोनेट, इंजिन आणि ग्रीलचा चक्काचूर झाला.

अपघाताचे (Accident) दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून धडकेनंतर झालेल्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघातात सौरभ व शुभम् क्षीरसागरला किरकाेळ मार लागला असून सागर कापडे यांच्या पाेटास गंभीर दुखापत तर त्यांच्या पत्नीच्या कमरेला जखम झाली आहे. घटनेनंतर   स्थानिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर रामवाडी भागात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते व नागरिकांची गर्दी जमली होती. याबाबत शुभम् क्षिरसागर यांनी फिर्याद नाेंदविली असून हवालदार नरेंद्र काेरडे तपास करत आहेत.

संशयित चालकावर गुन्हा

​अपघात घडवल्यानंतर संशयित कारचालक चेतन विसपुते हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ ए, १२५ बी, ३२४(२), माेटार वाहन कायद्यान्वये सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवणे, तसेच भरधाव वेगाने वाहन चालवून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

उत्तर प्रदेशात भाजपला धक्का? बडा नेत्याच्या ‘टाटा बाय-बाय’ पोस्टने राजकीय चर्चेला...

0
दिल्ली | Delhi उत्तर प्रदेशच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षाचे माजी...