Monday, May 4, 2026
HomeनाशिकNashik Accident News : चांदवडच्या राहुड घाटात टँकरचा अपघात; गॅस गळतीमुळे वाहतूक...

Nashik Accident News : चांदवडच्या राहुड घाटात टँकरचा अपघात; गॅस गळतीमुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

नाशिक | Nashik

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Aagra National Highway) चांदवडच्या राहूड घाटामध्ये (Rahud Ghat) भारत गॅसच्या बुलेट टँकरला ट्रकने कट मारल्याने गॅस टँकर पलटी होऊन भीषण अपघात (Accident) घडला आहे. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. तर सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरून मालेगावकडे (Malegaon) जाणारी सर्व वाहतूक मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे. तर मालेगावकडून येणारी वाहतूक (Traffic) चिंचवे उमराणे दरम्यान बंद करण्यात आली आहे. तर दोन्ही बाजूंची वाहतूक मनमाडमार्गे वळविण्यात आलेली आहे. या टँकरमधून सध्या गॅस गळती सुरू असून, ही गळती थांबविण्यासाठी मनमाड, सिन्नर येथून पथक रवाना झाले आहे.

तर घटनास्थळावर अग्निशमन दलाचे बंब सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच सोमाटोल कंपनीचे कर्मचारी आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत. टँकरचे गॅस गळतीचे काम जोखमीचे असल्याने त्या कामास संपूर्ण दिवस लागू शकतो, अशी माहिती चांदवड पोलीस (Chandwad Police) प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून खबरदारीची बाब म्हणून नाशिक-धुळे महामार्ग चांदवड येथे बंद करण्यात आला आहे. तर नाशिककडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक चांदवड-मनमाड मार्गे मालेगाव-धुळे अशी वळविण्यात आली आहे. तसेच धुळेकडून नाशिककडे येणारी वाहतूक मालेगाव-देवळा-सोग्रस-फाटा-नाशिक अशी वळविण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : धक्कादायक! चाळीसगावात अशोक खरात सारखे प्रकरण उघड; प्रेमप्रकरणातून...

0
चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisgaon नाशिकसह संपूर्ण राज्यात भोंदूगिरीकरुन लोकांची फसवणूक करणारा अशोक खरातचे प्रकरण गाजत असताना तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चाळीसगावातही देखील...