Wednesday, September 2, 2026
HomeनाशिकNashik Accident News : खासगी बसची दुचाकीला धडक; विवाहितेचा मृत्यू, रक्षाबंधन आटोपून सासरी...

Nashik Accident News : खासगी बसची दुचाकीला धडक; विवाहितेचा मृत्यू, रक्षाबंधन आटोपून सासरी परतताना घडली घटना

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

माहेरचा रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करून पतीसोबत सासरी परतणाऱ्या एका २७ वर्षीय विवाहितेचा रस्ते अपघातात मृत्यू (Road Accident Deth) झाल्याची हृदयद्रावक घटना सातपूर-त्र्यंबक रस्त्यावर (Satpur-Trimbak Road) घडली. या घटनेमुळे रक्षाबंधनाचा आनंद क्षणात दुःखात विरून गेला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील (Peth Taluka) खाेपाेली येथील रहिवासी असलेल्या प्रतीक्षा राजकुमार आवारी उर्फ प्रतिक्षा श्यामवेल इंपाळ (वय २७) या रक्षाबंधनानिमित्त नाशिक येथे आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. सणाचा आनंद आणि कौटुंबिक भेटीगाठी आटोपल्यानंतर बुधवारी (दि. २) सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास त्या पतीच्या मोटरसायकलवरून (एमएच १५ जीजी १८९२) पेठ येथील सासरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. ​त्र्यंबक रस्त्यावरील पपाया नर्सरीजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोरून जात असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या खासगी विद्यापीठाच्या बसने (एमएच १५ एचएन ६०७१) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या धडकेत दुचाकी फरफटत गेली आणि पाठीमागे बसलेल्या प्रतीक्षा या बसच्या (Bus) चाकाखाली आल्या. बसचे पुढील आणि मागील चाक अंगावरून गेल्याने त्यांच्या डोक्याला व हातापायास गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिक व पतीने प्रतीक्षा यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने दाेन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

​बस चालकाविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी पती श्यामवेल इंपाळ यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बस चालकाविरुद्ध रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोरख दिघे तपास करत आहेत.

ताज्या बातम्या