Thursday, October 1, 2026
HomeनाशिकNashik Accident News : मोटारसायकलस्वाराचा खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू

Nashik Accident News : मोटारसायकलस्वाराचा खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू

पळाशी | प्रतिनिधी | Palashi

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) साकोरा (Sakora) येथील एका मोटारसायकलस्वाराचा सारताळे येथे जात असताना साकोरे नजीक असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर पाइप टाकण्यासाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात मोटारसायकलसह पडल्याने जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

नांदगाव-वेहेळगाव (Nandgaon-Velgaon) नव्याने होत असलेल्या रस्त्यावर साकोरे नजीकच्या संतोष बोरसे यांच्या पेट्रोल पंपासमोरील (Petrol Pump) होत असलेल्या रस्त्यावर पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकण्यासाठी खड्डे खोदलेले आहेत. एका बाजूने पाइप टाकण्याचे काम केले आहे. तर दुसऱ्या बाजूला पाइप टाकण्यासाठी खड्डे खोदलेले आहे.

दरम्यान, या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने किरण शिवाजी छत्रे (रा. साकोरा, ता. नांदगाव) यांचा मोटारसायकलसह खड्ड्यात पडल्याने डोक्यास गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला. शेतकरी (Farmer) कुटुंबातील किरण आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल; काँग्रेस प्रभारी डॉ. सिरिवेल्ला...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai देशाची लोकशाही आणि संविधान संपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. भाजपने निवडणूक आयोगाला स्वतःचे एजंट बनवले असून देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी,...