Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Accident News : एसटीपुढे जाण्याच्या प्रयत्नात तरूणाचा मृत्यू

Nashik Accident News : एसटीपुढे जाण्याच्या प्रयत्नात तरूणाचा मृत्यू

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर | Pimpalgaon Baswant

निफाड-पिंपळगाव मार्गावर (Niphad-Pimpalgaon Highway) दावचवाडी शिवारात मंगळवार (दि. २४) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकलस्वार तरुण (Youth) एसटीवर धडकल्याने तरुणाचा (Youth) जागेवरच मृत्यू (Death) झाला.

- Advertisement -

याबाबत पिंपळगाव पोलिसांनी (Police) अधिक माहिती दिली. देवपूर पंचकेश्वर (ता. निफाड) येथील तरुण संतोष गोविंद घोरपडे वय (३०) हा पिंपळगाव बसवंत येथे काही कामानिमित्त मोटारसायकल क्र. (एम.एच.१५ एच. डब्ल्यू ६२७०) ने जात होता. दावचवाडीपुढे जाधव लॉन्सजवळ (एम.एच.०७ सी ९१०५) या एसटी बसला ओलंडून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना समोरून निफाड बाजूकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहन क्र. एमएच ०४ ई.टी. ४८५२ ने संतोषच्या
मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने तो एसटीवर धडकला. यात संतोषचे डोके व शरीराचा काही भाग एसटीच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

YouTube video player

दरम्यान, बसचालक हेमंत आचारे यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्याला (Pimpalgaon Police Station) खबर दिली. मृत संतोषला आठ महिन्याचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. संतोषच्या मृत्यूने पंचकेश्वर देवपूर येथे हळहळ व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला, तो रस्ता अरुंद असून एका बाजूला झुडपे व वळण आहे. त्यामुळे येथे दोन वाहने पास होतांना अनेकदा अपघात होत आहेत. निफाड सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढलेली झुडपे व रस्त्यावर पडलेले खड्डे याकडे दुर्लक्ष केल्याने वारंवार असे अपघात (Accident) होत आहेत.

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...