Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Accident News : बोलेरोची आयशरला धडक; एक ठार, तिघे जखमी

Nashik Accident News : बोलेरोची आयशरला धडक; एक ठार, तिघे जखमी

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

गुजरात राज्याला (Gujarat State) जोडणाऱ्या नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या चाचडगावजवळ (Chachadgaon) नाशिककडून (Nashik) भरधाव वेगाने येणाऱ्या बोलोरोने आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्याने बोलोरो वाहन रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यातील एक जण ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नाशिकवरून बोलोरो क्रमांक (एमएच १५ के ८९४१ )पेठ कडून येणाऱ्या वाहनाला तामिळनाडू येथील आयशर क्रमांक (टी एन ५९ डी एक्स ३१५७) आयशरला जोरदार धडक दिल्याने बोलेरो चालक मंगेश राजू हिरकुडे (वय २४) हा जागीच ठार (Killed) झाला, तर पेठ पोलीस काशीम शेख तसेच पेठ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत असणाऱ्या वर्षाराणी दशरथ आव्हाड व अमोल यांचे आडनाव कळू शकले नाही हे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती दिंडोरी पोलीस स्टेशनला कळताच दिंडोरी पोलीस स्टेशनचे (Dindori Police Station) पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलिस उपनिरीक्षक जाधव , पोलीस हवालदार गुलाब पवार, कॉन्स्टेबल साळवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शेगर हे करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...