Wednesday, September 23, 2026
HomeनाशिकNashik Accident News : मध्यरात्री भीषण अपघात! टायर फुटल्याने लक्झरी बस उलटून...

Nashik Accident News : मध्यरात्री भीषण अपघात! टायर फुटल्याने लक्झरी बस उलटून एक ठार; ७ गंभीर, २० किरकोळ जखमी

प्रवाशांमध्ये घबराट अन् गोंधळ

चांदवड | प्रतिनिधी | Chandwad

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे टायर अचानक फुटल्याने भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना चांदवड (Chandwad) येथील हॉटेल निकिताजवळ मध्यरात्री घडली. मालेगावकडून नाशिककडे (Malegaon to Nashik) जाणारी ही बस मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Aagra Highway) उलटल्याने झालेल्या अपघातात राजेंद्र अमरसिंग सोळुंकी (६०, पुणे) हे ठार झाले. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या शांततेत बसचा टायर फुटल्याचा प्रचंड आवाज आणि त्यानंतर प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता.

- Advertisement -

अपघातग्रस्त लक्झरी बस (क्र. एमएच १८ बीजी ४००५) ही मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जात होती. अचानक टायर फुटल्याने बस दुभाजकालगत उलटल्याने प्रवाशांमध्ये (Passengers) एकच आरडाओरड झाली. अपघाताची माहिती मिळताच, हायवे रुग्णवाहिका, पेट्रोलिंग टीम, तसेच स्थानिक पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातातील जखमींवर प्राथमिक उपचार सुरू असून, काहींना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात (Hospital) हलविण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. हायवे रिकव्हरी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

अपघातातील जखमी प्रवाशांची नावे

शोभा विजय बिरारी (रा. रावळगाव), पंकज मनोहरसिंग पाटील (रा. पुणे), नितीन वामन कुऱ्हाडे (रा. वणी), विजय तुळशीराम बिरारी (रा. रावळगाव), दर्शन भगवान पाटील (रा. पुणे), मिथुन तापीराम गिल (रा. आरवी), जयश्री चंद्रकांत पाटील (रा. आरवी), संगीता भगवान पाटील (रा. चुंबाळे), देवयानी पंकज पाटील, कल्पना अशोक चिले (रा. आरवी), तुषार तापीराम गिल (रा. पुणे), निंबा शिवाजी पाटील (रा. वणी, धुळे), मेघश्याम सुनील दंगल (रा. सटाणा), भूषण ताराचंद पाटील (रा. चोपडे), वंदना दिला चव्हाण (रा. पुणे), रेखा करण सोनवणे (रा. सांगवी), अरबाज भिका मेहलाल (रा. शिरपूर), मयूर सूर्यभान जाधव (रा. चांदवड)

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...