Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik Accident News : ट्रकखाली चिरडून अल्पवयीन मुले ठार

Nashik Accident News : ट्रकखाली चिरडून अल्पवयीन मुले ठार

चालकावर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अल्पवयीन असतानाही वेगात दुचाकी चालवताना समोरून येणाऱ्या सुपर कॅरी मालवाहू वाहन चालकाने (Driver) दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील १५ वर्षीय दोघे मित्र पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार (Killed) झाले. ही घटना संभाजीनगर रोडवरील मिर्ची हॉटेल ते टाकळी रोडदरम्यानच्या इच्छामणी सर्व्हिस स्टेशनलगत मंगळवारी (दि. १८) सायंकाळी चार वाजता घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून अल्पवयीन मुलांकडे मोपेड व दुचाकी चालवण्याचे परवाने नसतानाही त्यांच्यासह पालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

- Advertisement -

आयुष सोमनाथ तांदळे (१५, रा. काठे मळा, गांधीनगर, नाशिक) व साहिल प्रमोद बाविस्कर (१५, रा. समतानगर, आगरटाकळी, जेलरोड) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. तर अपघातासह दोघांच्या मृत्यूस (Death) कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुपर कॅरी मालवाहू वाहन (एमएच १५ जेसी ६०५०) वरील चालक संशयित गणेश तुकाराम गाडे (३४, रा. मु. पो. चितेगाव, ता. निफाड, जि. नाशिक) याच्यावर मृत आयुषचे काका पांडुरंग तुकाराम तांदळे (रा. आगरटाकळी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांदळे यांचा पुतण्या आयुष व त्याचा मित्र साहिल हे एमएच १५ झेड ८५१० या दुचाकीवरून टाकळी रोडने मिर्ची हॉटेलकडे जात होते. ते इच्छामणी सर्व्हिसस्टेशनच्या समोरुन जात असताना मिर्ची हॉटेलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या सुपर कॅरी वाहनावरील चालक गणेश गाडे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आयुष व साहिलच्या दुचाकीस समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही रस्त्याच्या बाजूने वेगात जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या (जीजे १६ जेयू २४००) चाकाखाली सापडले. त्यात त्यांच्या डोक्याला, पोटाला व पाठीला व अन्य अंगांना जबर दुखापत झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. तपास उपनिरीक्षक हरसिंग पावरा करत आहेत.

मागील महिन्यातच नाशिकमध्ये घडली होती घटना

फेब्रुवारी महिन्यात भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यालगतच्या पाणीपुरी विक्रीच्या हातगाड्यास धडकल्यानंतर तिचा पत्रा गळ्यास चिरून दुखापत झालेल्या १६ वर्षीय वेदांत विशाल गुरसळकर (रा. वज्रभूमी रो हाऊस नं-७, एमएसईबी सबस्टेशनजवळ, वडाळा-पाथर्डी रोड, नाशिक) या अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर साहिल व आयुषने अल्पवयीन असतानाही दुचाकी चालवून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याचे तपासात समोर आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...