Thursday, May 21, 2026
HomeनाशिकNashik Accident News : टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Nashik Accident News : टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

नाशिक-अकराळे फाटा रस्त्याचे (Nashik-Akrale Phata Road) रुंदीकरण काम सुरू असून, ढकांबे टोल नाक्याजवळ दुर्दैवी अपघात (Accident) घडला. रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरने दिलेल्या धडकेत शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, कमल देविदास बोडके (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. ढकांबे टोल नाक्याजवळ रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदाराकडून सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी केला. कामाच्या ठिकाणी कोणतीही योग्य सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षितता व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याचे नागरिकांनी (Citizen) म्हटले.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासन व ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हाभरात औषधांची 8300 दुकाने बंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ऑनलाईन फार्मसी कंपन्यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि औषध विक्रीतील अनियमित सवलतींना आळा घालण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाला बुधवारी...