निफाड | वार्ताहर | Niphad
ओझर येथून पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे शाळेत अध्यापनाचे काम करण्यासाठी येणाऱ्या शिक्षिकेच्या स्कूटीला भरधाव स्विफ्ट कारने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : नाशकात भाजपमध्ये मोठा राडा; एबी फॉर्मवरून वाद, कार्यकर्ते आक्रमक
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये आज (मंगळवारी) सकाळी अध्यापनाच्या कामकाजाला ओझर येथील दत्तनगर येथून मनीषा देविदास निरभवणे (वय ३८) या आपल्या ओला कंपनीच्या स्कूटी (क्रमांक एम एच १५ केडी २०६९) ने जात असतांना मुंबई-आग्रा महामार्गावरील टोल नाक्याच्या मागे कादवा नदी पुलावर स्विफ्ट कार क्रमांक (एम एच १५ जी आर १६३१) ने पाठीमागून जोराची धडक दिली.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : माजी नगरसेवक उद्धव निमसेंच्या मुलाला भाजपकडून उमेदवारी! पंचवटी प्रभागातून आणखी कुणाला संधी?
यात मनीषा निरभवणे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयत मनीषा यांचे दीर रवींद्र सुदाम निरभवणे यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलिसांनी (Pimpalgaon Police) स्विफ्ट कार चालक आकाश शेवाळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.




