Monday, September 14, 2026
Homeमुख्य बातम्याNashik Accident News : प्रशासनाचा निष्काळजीपणा! पाण्याच्या पाईपवर आदळून तरुणाचा मृत्यू, एक...

Nashik Accident News : प्रशासनाचा निष्काळजीपणा! पाण्याच्या पाईपवर आदळून तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

रस्त्यावर सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता सुरू असलेल्या कामामुळे एका तरुण पित्याचा बळी गेल्याची दुर्देवी घटना शहरातील कृषी नगर जॉगिंग ट्रॅकजवळ ( Krishi Nagar jogging track) घडली. कामावरून घरी परतत असताना अंधारात पाण्याच्या पाइपलाईनच्या पाइप्सवर दुचाकी धडकल्याने सिद्धार्थ गोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर (Accident) संतप्त नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

याबाबत अधिक माहिती अशी की,सिद्धार्थ गोरे आणि मनोज सूर्यवंशी हे दोन मित्र कामावरून घरी जात असतानाकृषी नगर जॉगिंग ट्रॅकजवळ पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू होते.रात्रीच्या वेळी पावसामुळे (Rain) आणि अंधार असल्यामुळे रस्त्यात आडवे टाकलेले काळे पाइप्सच्या अगोदर चिखल साचलेला होता. दरम्यान त्या ठिकाणी सुरक्षेसाठी कोणतेही रिफ्लेक्टर लावले नसल्याने दुचाकी थेट पाईपला जाऊन धडकल्याने सिद्धार्थ गोरे या तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गोरे कुटुंबावर मोठा आघात

दरम्यान, या अपघातामुळे गोरे कुटुंबावर (Gore Family) मोठा आघात झाला आहे. मृत सिद्धार्थ गोरे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि ६ महिन्यांची व २ वर्षांची अशा दोन लहान मुली आहेत. तरुण कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाचा आधार हरपला आहे.

नागरिकांचा संताप आणि पोलिसांत धाव

प्रशासकीय कामांदरम्यान नागरिकांची (Citizen) काळजी घेण्यासाठी योग्य सुरक्षा उपाय (रिफ्लेक्टर, सूचना फलक) व आदी गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक असतानाही ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे रस्त्यावर सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता निष्काळजीपणे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी एकत्र येऊन गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) धाव घेतली आहे.

ताज्या बातम्या