Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Accident : मालवाहतूक ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार

Nashik Accident : मालवाहतूक ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार

नाशिक | Nashik

चांदवडकडून (Chandwad) मालेगावच्या (Malegaon) दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात (Accident) एक जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.०९) रोजी दुपारच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ शंकर पवार असे मृत (Death) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवार हे चांदवडचा आठवडे बाजार करून राहुड (Rahud) येथे आपल्या घरी जात असताना रेणुका देवी मंदिर घाट परिसरात हा अपघात झाला. या अपघातात कच्च्या मालाने भरलेला संपूर्ण ट्रक (Truck) पवार यांच्या अंगावर आल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला.

दरम्यान, घटनास्थळी पडलेल्या चपलांच्या संख्येवरून तीन जण ट्रक खाली अडकल्याची भीती वर्तविण्यात येत होती. मात्र, सोमा टोल नाक्याच्या (Soma Toll Booth) क्रेनने ट्रक हटविल्यानंतर एकच मृतदेह आढळून आला. अपघातानंतर एकनाथ पवार यांचा मृतदेह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात (Chandwad Upazila Hospital) नेला असता त्याठिकाणी नातेवाईकांनी एकच गर्दी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...