Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Accident News : भरधाव डंपरने शाळेत जाणाऱ्या मुलीला चिरडलं; संतप्त ग्रामस्थांचा...

Nashik Accident News : भरधाव डंपरने शाळेत जाणाऱ्या मुलीला चिरडलं; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

चांदोरी | वार्ताहर | Chandori

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) चांदोरी जवळ (Chandori) आज सोमवार (दि.३०) रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास एका भरधाव डंपरने एकाचवेळी दुचाकीसह १२ वर्षीय मुलीला (Girl) धडक दिल्याने अपघात घडला आहे. या अपघातात (Accident) मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातानंतर संतप्त झालेल्या नागापूर ग्रामस्थांनी नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्ग तब्बल दीड तास रोखून धरला होता.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सिद्धी मंगेश लुंगसे (१२)असे अपघातात मृत्यू (Death) झालेल्या मुलीचे नाव आहे. सिद्धी ही आज सकाळी शाळेत (School) जात असताना नाशिक ते छत्रपती संभाजीनगर (Nashik to Chhatrapati Sambhajinagar) राज्य मार्गावर नागापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी तिला भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोराची धडक दिली. त्यामुळे सिद्धी हायवा डंपरच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

तसेच तिच्यासोबत असलेली तिची शाळकरी मैत्रीण अनुष्का जमधडे ही जखमी (Injured) झाली. तर याच दरम्यान या डंपरने डाव्या बाजूने दुचाकीवरून जात असलेले चांदोरी येथील ग्रामपालिका कर्मचारी विश्वनाथ जाधव या पती-पत्नीला धडक देत त्यांनाही गंभीर जखमी केले. अपघातग्रस्त डंपर हा नाशिकहून (Nashik) चांदोरीकडे जात होता. तसेच एकाच वेळेस दोन डंपर हे समांतर जात होते. तर मागे एक डंपर होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्यान, यानंतर घटनास्थळी सायखेडा पोलिसांनी (Police) तात्काळ धाव घेतली. तसेच सहायक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याशिवाय दोषींवर कारवाई (Action) करून याठिकाणी उपाययोजना करू, असे आश्वासन दिले. तर निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी देखील यावेळी अपघातस्थळाला भेट दिली.

सिद्धी होती एकुलती एक

अपघातानंतर नागापूर-चांदोरी परिसरावर शोककळा पसरली असून सिद्धी ही मंगेश लुंगसे यांची एकुलती एक मुलगी होती. तर अपघाताची माहिती मिळताच लुंगसे कुटुंबिय आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

ग्रामस्थांनी केला रास्तारोको

या अपघातानंतर नागपूर आणि चांदोरी येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. तसेच संबंधित डंपर चालकावर कठोर कारवाई व्हावी, नागापूर फाटा येथे गतिरोधक बसवून यामार्गे गोदाकाठ भागात नियमित धावणाऱ्या डंपरच्या वेगावर नियंत्रण आणावे, नागापूर फाटा येथे ब्लिंकर बसवावेत अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.

ताज्या बातम्या

Shrirampur : भंडारदराच्या पाणी चोरीवर उच्च न्यायालयाचा दणका

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur भंडारदरा धरणाच्या पाणी वाटपात होणारी प्रचंड चोरी आणि नादुरुस्त मोजमाप यंत्रणेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला कठोर शब्दांत फटकारले आहे....