नाशिक | Nashik
शहरातील नाशिक त्र्यंबकरोडवरील (Nashik-Trimbak Road) पिनॅकल मॉलजवळ शिवशाही बसने (Shivshahi Bus) ४ ते ५ वाहनांना धडक दिल्याने अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. बस चालकाचा ब्रेकच्या जागी एक्सेलेटरवर पाय पडल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातात दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांची तारांबळ
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशाही बस बस स्टँडमधून (Bus Stand) नाशिक त्र्यंबकरोडवरील पिनॅकल मॉलजवळ आली असता बस चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, चुकून ब्रेकऐवजी एक्सेलेटरवर पाय पडला आणि बसचा वेग अचानक वाढला. यात समोरच्या चार ते पाच वाहनांना (Vehicles) बसची धडक बसली. तर दोन दुचाकी बसखाली आल्याने त्या बससोबत पुढे फरफटत गेल्या. यावेळी सुदैवाने प्रसंगावधान राखत दुचाकीस्वार दुचाकी सोडून बाजूला झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
हे देखील वाचा : Jayant Patil : “गोकुळ झिरवाळांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अर्ज”; जयंत पाटलांची माहिती
दरम्यान, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका महिलेसह (Woman) काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अपघात झाल्यावर नागरिकांनी (Citizen) घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तर घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस (Mumbai Naka Police Station) घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा