Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Accident : वाघाड फाटा येथे अपघातात जवानाचा मृत्यू; एक ग्रामस्थ जखमी

Nashik Accident : वाघाड फाटा येथे अपघातात जवानाचा मृत्यू; एक ग्रामस्थ जखमी

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यातील उमराळे बु गावाजवळील वाघाड फाटा (Waghad Phata) येथे अज्ञात वाहनाने मोटरसायकलला कट मारल्याने जवानाचा (Soliders) जागीच मृत्यू झाला तर एक ग्रामस्थ जखमी झाला आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील उमराळे गावाजवळील (Umrale Villagers) वाघाड फाटा येथे काल (रविवारी) रात्री ९ च्या सुमारास एमएच.१५. के.ऐ ३२०४ या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने कट मारल्याने दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात पेठ तालुक्यातील (Peth Taluka) उंबरपाडा (क) या गावचे भूमिपुत्र बीएसएफ जवान शशिकांत नाठे याचा जागीच मृत्यू झाला.

YouTube video player

यानंतर त्यांचा अंत्यविधी उंबरपाडा ता.पेठ येथे आज (सोमवार) (दि.१६ रोजी) दुपारी दोन वाजता शासकीय इंतमामात होणार आहे. तर गवळीपाडा (Gavali Pada) येथील हिरामण गांगुर्डे हा ग्रामस्थ जखमी झाला असून त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या