नाशिक । Nashik
मनमाड-मालेगाव महामार्गावरील चांदवड कुंदलगावजवळ एक मालवाहतूक ट्रक विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. मालेगावहून मनमाडच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना हा ट्रक विहिरीत कोसळला.
- Advertisement -
सदर विहीर जवळपास ५० फूट खोल असून त्यामध्ये अंदाजे ४० फूट पाणी असल्याने विहिरीतून ट्रक बाहेर काढता येणे अवघड झाले आहे. ट्रक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.