Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Accident : समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Nashik Accident : समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

वावी | वार्ताहर | vavi

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघातात (Accident) तीन जण ठार झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. इनोव्हा कार क्रमांक (एमएच ०८ बीई ६००६) नागपूरकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जात होती. यावेळी समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ५४५.९ वरती मौजे मलढोण शिवारात मंबईकडे जात असणाऱ्या कंटेनरला इनोव्हाकारने जोरदार धडक दिली.

- Advertisement -

यामध्ये कारमधील चालकासह तिघांचा जागीच मृत्यू (Death) झाला. प्रतापराव सावंत देसाई, भाग्यवान झगडे आणि अथर्व किरण निकम अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर तिघे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी सिन्नर (Sinnar) येथील रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात (Vavi Police Station) मोटार वाहन कलम कायदा क्रमांक ३२४(४) व १८४ प्रमाणे अपघाताचा गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...