Sunday, September 27, 2026
HomeनाशिकNashik Accident News : नांदगाव-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, ४ जखमी

Nashik Accident News : नांदगाव-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, ४ जखमी

नाशिक | Nashik

नांदगाव येथील नांदगाव-मनमाड महामार्गावर (Nandgaon-Manmad Highway) हिरेनगर फाट्यावर आज (दि.२६) रोजी पहाटेच्या सुमारास दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात (Terrible Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; ‘हे’ आहे कारण

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात शिवाजी भास्कर देशमुख (वय ६०) रा.मोहाडी, नाशिक, उषा नारायण महाजन, (वय ६०) पाचोरा, जि.जळगाव यांचा मृत्यू झाला. तर आशा शिवाजी देशमुख (५५), विकास शिवाजी देशमुख (३५) दोघे रा.मोहाडी, नारायण सुखदेव महाजन (७०), गयाबाई अधिक देशमुख (६०) रा. मोहाडी अशी जखमींची (injured) नावे आहेत.

हे देखील वाचा : Accident News : कार आणि ट्रकचा भीषण अपघात; सात जण जागीच ठार

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने जखमींना शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल केले. तसेच हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...