नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महानगरपालिकेच्या ‘सिटीलिंक’ बसच्या (Citilink Bus) धडकेत एक तरुण (Youth) ठार झाल्याची घटना घडली आहे. नितीन विष्णु ढगे (३५, रा. बेळगाव ढगा, त्र्यंबकरोड) असे मृताचे नाव असून तो आडगावकडून द्वारका सर्कलकडे जात असतांना शुक्रवारी (दि.१५) दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Aagra Highway) कोणार्क नगरजवळ भरधाव सिटीलिंक बसने त्याला धडक दिली.
- Advertisement -
या धडकेत नितीनच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले. तेथून भाऊ राजहंस यांनी जिल्हा रूग्णालयात (District Hospital) दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.




