Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद; वीस दिवसांत 'इतक्या' प्रवाशांनी घेतला लाभ

नाशिकच्या विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद; वीस दिवसांत ‘इतक्या’ प्रवाशांनी घेतला लाभ

सातपूर | प्रतिनिधी

करोनाच्या लॉक डाऊन नंतर नाशिकहुन सूरू झालेल्या दोन विमान कंपन्यांच्या विमान सेवेला गेल्या वीस दिवसात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, दि.20 नोव्हेंबर ते दि. 11 डिसेंबर दरम्यानच्या 21 दिवसात 4 हजार 432 नागरिकांनी विमान सेवेचा लाभ घेतला. यातून नाशिकच्या विमानसेवेची उपयुक्तता अधोरेखित होत आहे.

- Advertisement -

कोवीडच्या लॉग डाऊन नंतर नागरी प्रवाससाठी विमानसेवा गतिमान केली होती. अलायन्स एअर लाईन्स व व ट्रयू जेट या दोन विमान कंपन्यांच्या माध्यमातून सध्या नाशिक विमानतळावरून हैदराबाद, बंगळूरू, दिल्ली व अहमदाबाद शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे.

दि.20 नोव्हेंबर पासून विमान सेवा गतीमान करण्यात आल होती. तेव्हा पासून दि. 30 नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथून नाशिक साठी 145 नाशिक येथून हैदराबाद कडे 167 प्रवाशांनी उडाण घेतली. बंगळूर साठी 528 प्रवासी नाशिक येथून गेले.

तर 468 प्रवासी नाशिककडे आले. याच कालावधीत दिल्लीहून नाशिक साठी 294 नाशिक हुन दिल्ली साठी 236 प्रवाशांनी उड्डाण घेतली दहा दिवसात 1838 प्रवाशी विमान सेवेचा लाभ घेताना दिसून आले

डिसेंबर मध्ये मात्र या संख्येत मोठी वाढ झाली आहे दि.1 डिसेंबर ते दि.11 डिसेंबर दरम्यान हैदराबाद-नाशिक साठी 346 नाशिक – हैदराबाद साठी 311 प्रवाशी तसेच बंगळुरू-नाशिक साठी 504 तर नाशिक- बंगळुरू साठी 506 प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला.

दिल्लीहून नाशिक साठी 492 नाशिक-दिल्लीसाठी 435 प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. या दहा दिवसात 2 हजार 594 प्रवाशांनी नाशिक विमानतळाचा उपयोग केला. यातून नाशिक विमानतळाची उपयुक्तता व नाशिकच्या नागरिकांसाठी ची अत्यावश्यक सेवा किती महत्वाची आह,े हे अधोरेखित होते.

नागरीकांचा प्रतिसाद व गरज लक्षात घेऊन लवकरच जामनेर, हिंदण, इंदोर, गोवा, नागपूर या शहरांनाही जोडण्याचे दृष्टीने विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या