Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक कृउबा निवडणूक : पिंगळे विरुद्ध पिंगळे, चुंभळेंचेही आव्हान; जिल्ह्याचे लक्ष लागून

नाशिक कृउबा निवडणूक : पिंगळे विरुद्ध पिंगळे, चुंभळेंचेही आव्हान; जिल्ह्याचे लक्ष लागून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 18 जागांकरिता होत असलेल्या निवडणुकीत तीन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 15 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये दुरंगी, तिरंगी लढत होणार आहे…

- Advertisement -

सहकारी संस्थेचा मतदारसंघाच्या ११ पैकी सर्वसाधारण सात जागांसाठी १८ उमेदवार, महिला राखीव दोन जागांसाठी चार, इतर मागास वर्गीय एका जागेसाठी दोन, विमुक्त जाती विमुक्त जमाती एका जागेसाठी दोन, उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदार संघ चार जागांपैकी सर्वसाधारण दोन जागांसाठी सहा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती एका जागेसाठी दोन, आर्थिक दुर्बल घटक एका जागेसाठी दोन असे एकूण ३७ उमेदवार रिंगणात आहेत.

यामध्ये माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या ‘आपलं पॅनल’ व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या ‘शेतकरी विकास पॅनल’मध्ये सरळ लढत होत आहे. सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटाच्या सात जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत.

यंदाची ‘मन की बात’ राहाणार विशेष.. काय आहे कारण? वाचा सविस्तर

यात माजी सभापती देविदास पिंगळे व त्यांचे बंधू गोकुळ पिंगळे हे सर्वसाधारण या एकाच गटातून आपले नशीब आजमावत आहेत. आपलं पॅनलकडून देविदास पिंगळे, संपतराव सकाळे, तुकाराम पेखळे, उत्तम आहेर, युवराज कोठुळे, उत्तम खांडबहाले, बहिरू मुळाणे रिंगणात आहेत. तर शेतकरी विकास पॅनलकडून शिवाजी चुंभळे, तानाजी करंजकर, गणेश चव्हाण, राजाराम धनवटे, नामदेव बुरंगे, प्रभाकर माळोदे, शिवाजी मेढे निवडणूक लढवत आहेत. तसेच अपक्ष म्हणून गोकुळ पिंगळे, अनिल ढिकले, पोपट पेखळे व दिनकर साळवे हे देखील रिंगणात आहेत.

सहकारी संस्था मतदारसंघातील इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या एका जागेसाठी आपलं पॅनलचे दिलीप थेटे व शेतकरी विकास पॅनलचे धनाजी पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. सहकारी संस्था मतदार संघातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी शेतकरी विकास पॅनलचे प्रल्हाद काकड व आपलं पॅनलचे विश्वास नागरे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.

सहकारी संस्था मतदारसंघातील महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असून समोरासमोर लढत होणार आहे. यामध्ये आपलं पॅनलच्या विजया कांडेकर, सविता तुंगार तर शेतकरी विकास पॅनलच्या कल्पना चुंभळे व शोभा माळवे यांच्यात लढत होणार आहे.

Video : जिल्हा बँकेच्या कारवाया थांबविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळाला ग्वाही

ग्रामपंचायत संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. आपलं पॅनलचे जगन्नाथ कटाळे व विनायक माळेकर, शेतकरी विकास पॅनलचे तानाजी गायकर व प्रकाश भोये, अपक्ष सोमनाथ जाधव व राजाराम धात्रक यांच्यात लढत होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ग्रामपंचायत संस्था मतदारसंघाच्या आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेल्या एका जागेसाठी सरळ लढत होणार असून आपलं पॅनलच्या निर्मला कड व शेतकरी विकास पॅनलचे सदानंद नवले यांच्यात लढत होणार आहे. ग्रामपंचायत संस्था मतदारसंघातील अनुसूचित जाती/ जमाती राखीव गटासाठी असलेल्या एका जागेसाठी तिरंगी लढत होत आहे. यामध्ये आपलं पॅनलचे भास्कर गावीत, शेतकरी विकास पॅनलच्या यमुना जाधव व अपक्ष अलका झोंबाड हे आमनेसामने आहेत.

पिंगळे विरुद्ध पिंगळे

सहकारी संस्थेचा मतदारसंघाच्या सर्वसाधारण गटातून देविदास पिंगळे व त्यांचे लहान बंधू गोकुळ पिंगळे हे एकाच गटातून रिंगणात आहेत. गोकुळ पिंगळे यांची वैद्यकीय कारणास्तव अर्ज माघारी राहून गेल्याचे सांगितले जात असले तरी हा अर्ज कायम राहावा यामागे खुद्द देविदास पिंगळे व त्यांच्या गटाचीच चाल असल्याची चर्चा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या