Wednesday, November 20, 2024
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : पेठला मतदानासाठी नागरिकांमध्ये उत्साह

Nashik Assembly Election 2024 : पेठला मतदानासाठी नागरिकांमध्ये उत्साह

कोहोर | वार्ताहर | Kohor

दिडोंरी-पेठ विधानसभा मतदारसंघात (Didonri-Peth Assembly Constituency) आज सकाळपासूनच मतदारांची (Voter) मतदानाला उत्सवात सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पेठ -दिडोंरी मतदारसंघात नागरिक सकाळी लवकर जाऊन मतदान करीत आहेत. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही सामवेश आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Assembly Election 2024 : जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३५ टक्के मतदान; सर्वाधिक दिंडोरी तर सर्वात कमी कुठे?

सकाळी ७ वाजता मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली.अनेक मतदान केंद्रात नागरीकांच्या (Citizen) स्वागतासाठी राखीव व सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ज्येष्ठांनी सकाळी लवकर मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला. पेठ तालुक्यात (Peth Taluka) बऱ्याच गावांना मतदान करण्यासाठी नागरिकांचा उत्साह दिसून येत होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या