Saturday, November 23, 2024
HomeUncategorizedNashik Assembly Election 2024 : नाशिक मध्यतून फरांदे...

Nashik Assembly Election 2024 : नाशिक मध्यतून फरांदे तर निफाडमधून बनकर आघाडीवर

नाशिक | Nashik

आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे १३ हजार ६०० मतांनी आघाडीवर आहेत. तर देवळालीत सहाव्या फेरी अखेर अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांना ३० हजार ९५७ मते ठाकरे गटाचे योगेश घोलप यांना ९ हजार १५७ आणि शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांना १४०८३२ इतकी मते मिळाली आहेत. नाशिक पूर्वमधून भाजपचे राहुल ढिकले हे ३ हजार २२२ मतांनी आघाडीवर आहेत.

- Advertisement -

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरी अखेर शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री दादा भुसे ३० हजार १९० मतांनी आघाडीवर आहेत. तर सिन्नरमधून आठव्या फेरीत माणिकराव कोकाटे १८ हजार २४४ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच बागलाणमधून चौथ्या फेरी अखेर भाजप महायुतीचे दिलीप बोरसे २३ हजार ६५० मतांनी आघाडीवर आहेत.तर तिसऱ्या फेरी अखेर नाशिक मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे वसंत गीते यांना १२ हजार ६४४ आणि फरांदे यांना १६ हजार ४८६ मते मिळाली आहेत. तर नाशिक पूर्व मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर भाजपच्या राहुल ढिकले यांना ७ हजार ३४० आणि शरद पवार गटाच्या गणेश गीते यांना ३ हजार ४३२ मते मिळाली आहेत.

तसेच येवला मतदारसंघातून सातव्या फेरी अखेर छगन भुजबळ ८ हजार ७०० मतांनी आघाडीवर आहेत. तर दिंडोरीत ११ व्या फेरीत नरहरी झिरवाळ १९ हजार ९२७ मतांनी पुढे आहेत. तसेच चांदवमधून चोथ्या फेरीत डॉ.राहुल आहेर (भाजप) २७४४१, केदा आहेर (अपक्ष) १४०८५ मते मिळाली आहेत. त्यामुळे याठिकाणी डाॅ. राहुल आहेर १३ हजार ३५६ मतांनी आघाडीवर आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या