Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : मालेगाव मध्यतून शेख तर दिंडोरीतून झिरवाळ आघाडीवर

Nashik Assembly Election 2024 : मालेगाव मध्यतून शेख तर दिंडोरीतून झिरवाळ आघाडीवर

नाशिक | Nashik

आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघात अजित पवार गटाच्या दिलीप बनकर यांना दहाव्या फेरी अखेर ६४ हजार ७९१ मते मिळाली आहेत. तर अनिल कदम यांना ४३ हजार ०७१ इतकी मते मिळाली आहेत. त्यामुळे बनकर २१ हजार ७२० मतांनी पुढे आहेत. तसेच इगतपुरी मतदारसंघातून खोसकर हे ३७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर आठव्या फेरी अखेर नांदगावमध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे यांना ३५ हजार २५० इतके मताधिक्य मिळाले आहे. तसेच कळवण विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे नितीन पवार यांना १९ हजार २८१ इतकी मते मिळाली आहे. तर महाविकास आघाडीचे जे पी गावित यांना २४ हजार ७०३ मते मिळाली असून ते ५ हजार ४२२ मतांनी आघाडीवर आहेत.

- Advertisement -

तसेच सिन्नरमधून अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे १३ व्या फेरीत ३५ हजार ३५९ मतांनी आघाडीवर आहेत. नाशिक मध्यतून पाचव्य फेरी अखेर भाजपच्या देवयानी फरांदे यांना १० हजार ५३८ मतांची आघाडी मिळाली आहे.पाचव्या फेरीत गीते यांना २ हजार ७४६ तर फरांदे यांना ५ हजार ६६० मते मिळाली आहेत. बागलाण विधानसभा मतदारसंघातून सातव्या फेरी अखेर भाजप महायुतीचे दिलीप बोरसे ४३ हजार ५६२ मतांनी आघाडीवर आहेत. तर येवल्यातून आठव्या फेरीअखेर छगन भुजबळ ८ हजार २०० मतांनी आघाडीवर आहेत. याशिवाय १३ व्या फेरी अखेर अजित पवार गटाचे दिलीप बनकर २० हजार ५९० मतांनी आघाडीवर आहेत.

तर नाशिक पूर्व मतदारसंघातून चौथ्या फेरी अखेर राहुल ढिकले यांना ७ हजार ०२४ मते मिळाली असून
गणेश गीते यांना ४ हजार २९ मते मिळाली आहेत. त्यामुळे ढिकले यांना १३ हजार ४८८ मतांची आघाडी मिळाली आहे.
तसेच मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे अकराव्या फेरी अखेर ४८ हजार ०६० मतांनी आघाडीवर आहेत.याशिवाय मालेगाव मध्य मतदारसंघातून दहावी फेरीतून आशिफ शेख ११ हजार ९८५ मतांनी आघाडीवर आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...