Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : नांदगावमधून शिवसेनेचे सुहास कांदे विजयी; समीर भुजबळ...

Nashik Assembly Election 2024 : नांदगावमधून शिवसेनेचे सुहास कांदे विजयी; समीर भुजबळ यांचा पराभव

नाशिक | Nashik

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात राज्याच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीच्या हातात गेल्या आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी देखील पुन्हा एकदा आमदार होण्याचा बहुमान मिळाला आहे.

- Advertisement -

यात नाशिक जिल्ह्यातील येवला, दिंडोरी, निफाड,देवळाली,इगतपुरी,बागलाण या मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना संधी मिळाली आहे. अशातच आता नांदगाव आणि मालेगाव बाह्य मतदारसंघाचा निकाल देखील समोर आला आहे.यामध्ये नांदगावमधून शिवसेनेचे सुहास कांदे विजयी झाले आहेत. कांदे यांना २४ व्या फेरी अखेर १ लाख ३५ हजार ७७८ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना ४७ हजार १३० मते मिळाली आहेत. त्यामुळे सुहास कांदे यांचा ८८ हजर ६४८ मतांनी विजय झाला आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ जानेवारी २०२६ – नवा वाचनतोडगा

0
वाचनसंस्कृती रुजवण्याची गरज नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे तिची आठवण पुन्हा...