नाशिक| प्रतिनिधी | Nashik
पोलीस आयुक्तालय (Police Commissionerate) हद्दीत असलेल्या शहरातील चार व इगतपुरी मतदारसंघांची (Igatpuri Constituencies) ईव्हीएम मशिने ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र पाेलीस दलासह स्थानिक पाेलिसाचे तिहेरी कडे उभारण्यात आले आहे. या परिसरात पाेलीस व प्राधिकृत व्यक्तिलाच प्रवेश असून संपूर्ण परिसर निर्मनुष्य असेल. त्याचप्रमाणे २४ तास आयुक्तालयाच्या पथकांकडूनही गस्त राहणार आहे.
विधानसभा निवडणुक (Vidhansabha Election) मतदानाची (Voting) प्रक्रिया संपल्यानंतर बुधवारी (दि. २०) उशिरापर्यंत मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्ट्राँगरुममध्ये सशस्त्र बंदोबस्तात पोहोचल्या. मतमोजणीच्या चारही ठिकाणी स्ट्राँग रुम उभारण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी बुधवारी (दि. २०) सायंकाळपासून कडेकोट सशस्त्र दलासह पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, स्ट्राँगरुमच्या (Strongroom) भोवतीच्या पहिले सुरक्षात्मक कडे हे आयटीबीपी (इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्स) ची सशस्त्र तुकडीकडे आहे. तर दुसऱ्या स्तरावर राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र तुकड्या तैनात आहेत. तर तिसऱ्या स्तरावरील बंदोबस्त शहर पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. याशिवाय, शनिवारी (ता.२३) मतमोजणीपर्यंत शहर आयुक्तालयाच्या विशेष गस्त पथकांकडून दिवसरात्र गस्त असणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा