Tuesday, November 19, 2024
HomeनाशिकAssembly Elections 2024 : मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

Assembly Elections 2024 : मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) मतदानाची (Voting) सर्व तयारी पूर्ण झाली असून, दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे. सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. जाहीर प्रचाराची सांगता आज झाल्याने कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांना आता कोणत्याही माध्यमातून जाहीर प्रचारास प्रतिबंध असेल, असे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी आज विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचार सांगतेसंदर्भात पत्रकार परिषदेत (Press Conference) माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्षाचे प्रमुख राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे उपस्थित होते.

जिल्ह्यात ४,९२२ मतदान केंद्रे

नाशिक जिल्हाभरातील (Nashik District) १५ विधानसभा मतदार संघात ४ हजार ९२२ मतदान केंद्रे असून, मंगळवारी (दि.१९) सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्यांचे वाटप केंद्रातून केले जाणार आहे. जिल्हाभरात २७ हजार ७१ कर्मचारी निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, एक शिपाई, एक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

१,६१९ वाहनांची व्यवस्था

जिल्हातील १५ विधानसभा मतदार संघात निवडणूक मतदानासाठी ७,०२६ बॅलेट युनिट, ५,८९९ कंट्रोल युनिट, तर ६,३९१ व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक साहित्यांसह मतदान अधिकारी, कर्मचारी यांची मतदान केंद्रावर ने- आण करण्यासाठी ५११ बसेस, ९१ मिनी बसेस

मतदान केंद्रांवर विशेष नजर

जिल्हाभरातील ४ हजार ९२२ मतदान केंद्रांपैकी ३२८० मतदान केंद्रांवर विशेष यंत्रणा उभारण्यात आलेली असून, त्या माध्यमातून त्या मतदारसंघात सुरु राहणाऱ्या विविध घडामोडींच्या चित्रणाचे प्रत्यक्ष नियंत्रण जिल्हा प्रशासनाच्या कन्ट्रोल कक्षातून केले जाणार आहे. मतदान कक्षात मोबाईल नेण्याला बंदी करण्यात आलेली असल्याने प्रत्येकाने आपले मतदान ओळखपत्र अथवा मान्यताप्राप्त १२ ओळख पत्रांची सत्यप्रत सोबत बाळगणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या