Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik BJP Politics : नाशिकरोडच्या भाजप कार्यालयाबाहेर आमदार ढिकलेंविरोधात निष्ठावंतांची घोषणाबाजी; शहराध्यक्षांना...

Nashik BJP Politics : नाशिकरोडच्या भाजप कार्यालयाबाहेर आमदार ढिकलेंविरोधात निष्ठावंतांची घोषणाबाजी; शहराध्यक्षांना घातला घेराव, पोलिसांचा फौजफाटा तैनात

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

महापालिका निवडणुकीत (NMC Election) इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी मिळाल्याने नाशिक भाजपात (Nashik BJP) निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे काही निष्ठावंतांनी बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. तर काही माजी नगरसेवकांचा देखील पत्ता कापल्याने त्यांनी इतर पक्षांत प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. भाजपमधील अंतर्गत नाराजीला आमदारांसह शहराध्यक्षांना सामोरे जावे लागत असून, त्यांच्याविरोधात निष्ठावंत घोषणाबाजी करून संताप व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

प्रभाग क्रमांक २९ मधून उमेदवारी न मिळाल्याने काल (बुधवारी) बाळासाहेब घुगे या भाजपच्या निष्ठावंतांनी आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत स्वत:चे तोंड झोडून घेतले होते. यानंतर आज (गुरुवारी) नाशिकरोडच्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयसमोर आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांच्याविरोधात सचिन लांडगे, शरद जगताप, महेंद्र पोरजे, मंगेश रोजेकर, प्रवीण झळके यांनी घोषणाबाजी केली.

YouTube video player

तर कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी आलेल्या शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांना भाजपच्या याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घालत आम्हाला उमेदवारी का दिली नाही? असे म्हणत जाब विचारला. तसेच दुसऱ्यांना कोणत्या निकषाचा आधारे उमेदवारी दिली, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांच्या नंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाशिकरोडच्या भाजप कार्यालयाबाहेर दाखल होत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर भाजप कार्यालयाला (BJP Office) कुलूप लावण्यात आले. सध्या पोलिसांचा (Police) फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून, बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रातून आता पावसाचे अपडेट

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे लहरी, खराब हवामानामुळे शेतकर्‍यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प...