Saturday, January 24, 2026
HomeनाशिकNashik BJP Politics : भाऊ-ताईंना अधिकार समान; कोणाला मिळणार मान

Nashik BJP Politics : भाऊ-ताईंना अधिकार समान; कोणाला मिळणार मान

नाशिक | Nashik

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी (Nashik Municipal Corporation Election) भारतीय जनता पक्षाने मनपा निवडणूक प्रमुखपदी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांची नियुक्ती केली होती. पंरतु, अचानक ढिकले यांना भाजप उमेदवार निवड समितीच्या प्रमुख पदावरून हटविण्यात आले होते. यामागे त्यांचा पक्षांतर्गत विरोधकांना दिलेला गर्भित इशारा कारणीभूत असल्याची चर्चा होती. यामुळे भाजप कार्यकर्त्यांसह (BJP Workers) विरोधकही बुचकळ्यात पडले होते. तसेच सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : मनपा निवडणूक प्रमुखपदावरून राहुल ढिकलेंना डच्चू; ‘त्या व्हिडीओतील विधान’ भोवल्याची चर्चा!

YouTube video player

त्यानंतर २४ तासांतच भाजपाने यू-टर्न घेत निवडणुकीसाठी संघटनात्मक व्यवस्थेचा भाग म्हणून राहुल ढिकलेंबरोबरच आ. देवयानी फरांदे यांच्यावरही जबाबदारी सोपविल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाऊ आणि ताई यांना आता नाशिक मनपा निवडणुकीसाठी समसमान अधिकार असणार आहेत. भाजपने शहरातील पक्ष कार्यालयात चार दिवस मुलाखतींचा कार्यक्रम राबविला. यात १२२ जागांसाठी तब्बल १२०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. इच्छुकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शहराध्यक्ष सुनील केदार यांनी वरिष्ठांकडे निवडणूक स्वबळावर लढवावी,अशी पक्षातील कार्यकर्त्यांची भावना असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व याबाबत काय निर्णय घेते? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

दरम्यान, आमदार ढिकले यांनी रविवार (दि. १४) रोजी मखमलाबाद रोडवरील सहकार महर्षी कै. उत्तमराव ढिकले जॉगिंग ट्रॅक विस्तारीकरण भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलतांना पक्षांतर्गत विरोधकांवर जहरी टीका केली होती. आजारी असतानाही माझ्याविरोधात काम करणाऱ्यांना, माझी रॅली अडवणाऱ्यांना असमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. ढाक लावून आसमान दाखवले नाही तर ढिकले नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. निवडणूकप्रमुखच जाहीरपणे असा गर्भीत इशारा देत असल्याने ढिकले विरोधकांनी त्याचे पुरेपूर भांडवल केले. त्यांनी आपले कसब पणाला लावून ढिकले यांच्या वक्तव्याचा पक्षावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा संदेश वरिष्ठ नेत्यांपर्यंत नेला अशी कुजबूज भाजपमध्ये सुरू होती. परंतु,ढिकले यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यावर शहराध्यक्ष केदार यांनी वर्तमान पत्रे व टीव्ही चॅनलवर आलेल्या उलटसुलट बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे म्हटले होते.

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : ‘त्यांचा’ पक्षांतर्गत विरोधकांना इशाराच कारणीभूत; नेमकं काय घडलंय?

युतीबाबत संभ्रम

वरिष्ठ पातळीवर जरी महायुती म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर गणित वेगळे आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनीच ‘युती नको, आपण स्वतंत्र लढू’ या कार्यकर्त्यांच्या व इच्छुक उमदेवारांच्या भावना वरिष्ठांना कळवल्या आहेत. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आता पक्षाकडे सर्व जागांवर सक्षम उमेदवार असल्याने युती करू नये, अशी भूमिका घेतल्याने भाजप-शिवसेना (शिंदे गट) संभाव्य युतीला सुरुंग लागला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : खुनाच्या गुन्ह्यातील चौघांना जन्मठेप

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत लोखंडी रॉडने मारहाण करून खून करणाऱ्यांना चौघांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप...