Wednesday, January 28, 2026
HomeनाशिकNashik BJP Politics : नव्या महापौराची 'या' तारखेला होणार निवड, कुणाच्या गळ्यात...

Nashik BJP Politics : नव्या महापौराची ‘या’ तारखेला होणार निवड, कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

महापौरपदासाठी 'ही' नावे चर्चेत

नाशिक | Nashik

महापालिका निवडणुकीचा निकाल (Nashik Municipal Corporation Result) लागून दोन आठवडे होत आले आहेत. मागील आठवड्यात महापौरपदाची आरक्षण (Mayor Reservation) सोडत जाहीर झाली. यात नाशिक महापालिकेचे महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपला तब्बल ७२ जागांवर यश मिळाल्याने तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यानंतर आता भाजपकडून महापौरपदाचा उमेदवार निवडीच्या हालचाली सुरु झाल्या असून, नाशिकचा नवीन महापौर कधी निवडला जाणार? याची तारीख समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजेच शुक्रवार (दि.०६ फेब्रुवारी) रोजी महापौर निवडीसाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेत नाशिकचा (Nashik) नवीन महापौर निवडला जाईल. महापालिका निवडणुकीत भाजपने ७२, शिंदे सेनेला २६, ठाकरेंच्या शिवसेनेने १५, काँग्रेसने ०३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ०४ मनसेने एक आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळविला आहे. मनपा निवडणुकीत युती न झाल्यामुळे महायुतीमधील भाजप हा पक्ष स्वतंत्र लढला होता. तर शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे शिंदेंची सेना महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे.

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : अखेर ठरलं! महापालिकेत ‘हा’ नगरसेवक सांभाळणार भाजपची धुरा

दरम्यान, भाजपने महापालिकेच्या गटनेतेपदी (Group Leader) प्रभाग क्रमांक ३० मधून दुसऱ्यांदा निवडून आलेले ॲड. श्याम बडोदे यांची निवड केली आहे. यानंतर आता महापौरपदी कुणाची वर्णी लागते याकडे, सर्वांचे लक्ष लागून आहे. महापौर पदासाठी इच्छुक महिला उमेदवारांनी नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेत लॉबिंग सुरु केली आहे. परंतु, महापौरपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि मंत्री गिरीश महाजन घेणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे यंत्या एक ते दोन दिवसांत महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव समोर येणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Politics : महापौर पदासाठी देव पाण्यात ठेवलेल्यांचा भ्रमनिरास; ‘या’ बड्या इच्छुकांची संधी हुकली

भाजपचा ‘शंभर प्लस’चा नारा प्रत्यक्षात मात्र उतरलाच नाही

महापालिका निवडणुकीत भाजपने ‘शंभर प्लस’चा नारा दिला होता. परंतु, त्यांचे ७२ नगरसेवकच निवडून आले. मंत्री गिरीश महाजन हे वारंवार आमचे १०० हून अधिक नगरसेवक निवडून येतील असे सांगत होते. मात्र, यात त्यांना अपयश आले. भाजपच्या काही नगरसेवकाचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला. तर काही ठिकाणी त्यांना उमेदवार निवडताना आणि एबी फॉर्म वाटताना झालेल्या गोंधळाचा फटका बसला. त्यामुळे भाजपचा ‘शंभर प्लस’चा नारा प्रत्यक्षात नगरसेवकांच्या संख्येत उतरलाच नाही.

हे देखील वाचा :  Nashik Mayor Reservation: आरक्षण सोडत जाहीर होताच महापौरपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत; भाजपकडून कुणाला मिळणार संधी?

महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

भाजपकडून उद्या (दि.२८) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर महापौर निवडीला खऱ्या अर्थाने गती येणार आहे. महापौरपदासाठी भाजपकडून आमदार राहुल आहेर यांच्या भगिनी आणि माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्यांच्याकडे राजकीय वारसा, प्रशासकीय अनुभव आणि संघटनात्मक ताकद असल्यामुळे त्यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे. तसेच स्वाती भामरे, दिपाली गीते, डॉ. योगिता हिरे, माधुरी बोलकर,चंद्रकला धुमाळ यांचीही नावे महापौरपदासाठी शर्यतीत आहेत. त्यामुळे आता महापौरपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

हे देखील वाचा : Mayor Reservation : नाशिक, मालेगाव, धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव; वाचा कोणत्या महापालिकेत कुठले आरक्षण?

ताज्या बातम्या

विमान

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर विमान कंपनीच्या मालकाची पहिली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiराष्ट्रवादी काँग्रेस(अप) पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज(दि.28) सकाळी बारामती येथे विमानअपघातात दुःखद निधन झाले. बारामतीविमानतळावर...