नाशिक | Nashik
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज (मंगळवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटचा दिवस होता. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करतांना आपल्या पक्षांकडून एबी फॉर्म (AB Form) मिळावा यासाठी उमेदवार प्रयत्नशील होते. यात काहींना मिळाला तर काहींना वेटींगवर राहावे लागले. यात अखेरच्या क्षणी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामध्ये एका खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या माजी नगरसेवक उद्धव निमसे (Uddhav Nimse) यांच्या मुलाला भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे धोत्रे खून प्रकरणात संशयित आरोपी असून, सध्या कारागृहात आहेत. यानंतर भाजपने प्रभागातील पक्षीय बलाबल आणि राजकीय ताकद लक्षात घेऊन उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धेश निमसे (Reddhish Nimse) यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. यावेळी रिद्धेश निमसे यांनी विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्यासोबत असल्याने निवडणुकीत विजय निश्चित मिळेल, असे म्हटले आहे. तर भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील हे देखील पंचवटीतील गोळीबार प्रकरणात कारागृहात आहेत. त्यांच्या घरातील व्यक्तीला भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, पाटील यांच्या घरातील कुणालाही उमेदवारी मिळालेली नसल्याचे समजते.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : नाशकात भाजपमध्ये मोठा राडा; एबी फॉर्मवरून वाद, कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik) निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपकडून डावलले जात असल्याने आज निष्ठावंत चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांच्याकडे एबी फॉर्म असल्याची माहिती मिळताच इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. या वाहनामध्ये आमदार राहुल ढिकले आणि सीमा हिरे होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावंतांना डावलून काही नवीन आणि बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप केला. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करूनही संधी मिळत नसेल, तर मेहनतीचे मोल काय? अशी खदखद देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली.
हे देखील वाचा : Nashik NMC Election : भाजपकडून ‘यांना’ मिळाले एबी फॉर्म; शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही उमेदवार जाहीर
पंचवटी प्रभागातून खालील उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म दिल्याचे समजते.
प्रभाग एक
रुपाली नन्नावरे
रंजना भानसी
दिपाली गिते
अरुण पवार
प्रभाग दोन
ईश्वर्या लाड
इंदुबाई खेताडे
रिद्धेश निमसे
नामदेव शिंदे
प्रभाग तीन
जुई शिंदे
प्रियांका माने
मच्छिन्द्र सानप
गौरव गोवर्धने
प्रभाग चार
मोनिका हिरे
सरिता सोनवणे
हेमंत शेट्टी
सागर लामखडे
प्रभाग पाच
गुरुमित बग्गा
खंडू बोडके
निलम पाटील
चंद्रकांला धुमाळ
प्रभाग सहा
मनीष बागुल
वाळू काकड
रोहिणी बाप्पू पिंगळे
चित्रा तांदळे




