नाशिक | प्रतिनिधी
काल (दि. २८) देवळा तालुक्यातील मेशी येथे झालेल्या बस आणि रिक्षा अपघातामध्ये २६ प्रवाशांचा मृत्यू झाला तसेच या घटनेत ३५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी आहेत.
- Advertisement -
आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या कुटुंबियांना या दुखातून सावरण्याची शक्ती मिळो. तसेच या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशाही राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.