Friday, May 31, 2024
Homeनाशिकनाशिककरांना दिलासा : शहरातील आणखी चार प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध हटवले; दैनंदिन व्यवहार...

नाशिककरांना दिलासा : शहरातील आणखी चार प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध हटवले; दैनंदिन व्यवहार होणार सुरु

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरातील विविध प्रतिबंधित क्षेत्रात मनपाकडून सर्व्हे केला जात आहे. यानुसार आज १४ दिवसांचे सर्व्हेक्षण पूर्ण केलेल्या ठिकाणी मागील १४ दिवसांत एकही रुग्ण बाधित आढळून न आल्याने चार प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध हटविण्यात आले आहेत. यामध्ये सातपूर कॉलनी, मालपाणी सॅफ्रोन पाथर्डी फाटा, उत्तम नगर, सावता नगर या परिसरांचा समावेश आहे. आज सकाळी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडून निर्बंध हटविण्याबाबतचे आदेश देण्यात आले.

- Advertisement -

याआधी शहरातील तीन प्रतिबंधित क्षेत्रे रद्द करण्यात आली होती. यात नाशिकरोड येथील धोंगडे मळा, म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्ग परिसर व सातपूरमधील संजीव नगर या तीन ठिकाणांचा समावेश आहे. आज हटविण्यात आलेल्या चार ठिकाणांमुळे शहरातील सात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आता दैनंदिन व्यवहार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या