Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Bribe News : निवडणुकीच्या धामधुमीत त्र्यंबक नगरपरिषदेत लाचखोरी; १० हजारांची लाच...

Nashik Bribe News : निवडणुकीच्या धामधुमीत त्र्यंबक नगरपरिषदेत लाचखोरी; १० हजारांची लाच घेताना दोघांना अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दोन दिवसांपूर्वी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Sinnar MIDC Police Station) आवारात पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक (Arrested) केली होती. ही घटना ताजी असतानाच आता त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील (Trimbak Nagarparishad) दोन कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीत ही घटना घडल्याने त्र्यंबक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराला त्र्यंबकेश्वर येथील स्व:तच्या भूखंडावर नवीन घराचे बांधकाम सुरू करायचे आहे. यासाठी वास्तूविशारदामार्फत नगरपालिकेकडे ऑनलाईन कागदपत्रे सादर करून विहित शुल्काचे चलनही भरले होते. परंतु, बांधकामाची परवानगी प्राप्त झाली नाही. त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी तक्रारदार कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेले असता तेव्हा त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील रचना सहायक (वर्ग दोन) मयूर शाम चौधरी याने स्वताच्या भ्रमणध्वनीवर २५ हजार असे टाईप करून ही रक्कम सफाई कामगार अमोल दोंदे याच्याकडे देण्यास सांगितले. तडजोडीअंती १० हजार रुपयांची रक्कम देण्याचे निश्चित झाले होते.

YouTube video player

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नाशिक (ACB Office Nashik) येथे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता संशयित अमोल दोंदे याने २५ हजार रुपये, लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यास संशयित मयूर चौधरीनेही मान्यता दिली. यावेळी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच (Bribe) एकत्रितपणे स्वीकारताना लाचलुचपतपथकाने दोघांना रंगेहात पकडले.

दरम्यान, या प्रकरणी रचना सहायक (वर्ग दोन) मयूर चौधरी आणि सफाई कामगार अमोल दोंदे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून उपअधीक्षक स्वाती पवार यांनी काम पाहिले. तर सापळा पथकात पोलीस हवालदार शरद हेबाडे, युवराज खांडवी, परशुराम जाधव यांचा समावेश होता.

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...