दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कोशिंबे येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडुन शासनाकडून प्राप्त अनुदानाचे लेखा परीक्षण होऊनही २० हजार रुपयांचे कमिशन मागुन अडवणुक करणार्या तालुका वैद्यकीय अधिकार्यांना २० हजाराची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखवा करण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे (Koshinbe) येथील सरकारी आयुर्वेद दवाखाना येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असुन त्यांचे दवाखान्यास सन २०२०-२०२१ ते २००३ ते २००४ पावेतो शासनाकडुन प्राप्त अनुदान म्हणून विविध कामांसाठी २ लाख २७ हजार रुपये दवाखान्याच्या विविध कामांसाठी वापरण्यात आला होता. या खर्चाचे लेखा परीक्षण करण्यात आले आहे. तरीही या निधीवर कमिशन म्हणून २० हजाराची मागणी तक्रारदार यांचेकडे करण्यात आली. पंचायत समिती कार्यालयात रक्कम मागीतल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले.
कलानगर म्हसरुळ (Mhasrul) येथे २० हजाराची लाच स्वीकारताना दिंडोरी तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष हरीभाऊ मांडगे यांना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन रंगेहाथ जेरबंद करण्यात आले आहे. म्हसरुळ पोलिस ठाणे येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी वणी येथील तलाठ्याला लाच घेताना पकडण्यात आले होते. चौकशीत मोठे घबाड सापडल्याची चर्चा सुरु असताना आता प्रथम श्रेणी तालुका वैद्यकीय अधिकारी याला पकडण्यात आल्याने दिंडोरी तालुक्यातील प्रशासकीय कार्यप्रणाली पुढे आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा